अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांशी आ. समाधान आवताडे यांनी साधला संवाद
पंढरपूर : प्रतिनिधी पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झालेअसून आ समाधान आवताडे यांनी आज दिनांक 24 रोजी दिवसभर खुपसंगी, लेंडवे चिंचाळे आंधळगाव,मारापूर,पंढरपूर तालुक्यातील तनाळी, तपकिरी शेटफळ, तावशी, चिचुंबे, सिद्धेवाडी येथील आदी गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत निसर्गाच्या अवकृपने पिचलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीवर हात ठेवत दिलासा देऊन सरकारच्या माध्यमातून सर्वोतोपरी मदत देऊ असे आश्वासन दिले तसेच यावेळी मारापूर येथे पर्जन्यापकाच्या आकडेवारीत फरक असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिल्याने आ.समाधान आवताडे यांनी स्कायमेटच्या अधिकाऱ्यांना झापले.चुकीच्या नोंदी करून संबंधित कंपनीला मदत करत आहात का असा सवाल करत चुकीचे काही केल्यास याद राखा असा सज्जड दम भरला
गेल्या पंधरा दिवसापासून मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यांमध्ये पावसाने थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून मातीचे बांध रस्ते वाहून गेले आहेत खरीप पिके फळबागा यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.यामध्ये मका, सूर्यफूल, बाजरी, टोमॅटो, मिरची, कांदा, भुईमुग, उडीद, दोडका या खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. या संकटाशी सामना करण्याचे बळ देण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना धीर देऊन परिस्थिती जाणून घेत त्यांची व्यथा जाणून घेतल्या. शेतातील उभ्या पिकांचे, घरांचे झालेल्या नुकसानीमुळे सर्व ठिकाणचे जनजीवन विस्कळित झाले आहे. याची त्यांनी पाहणी केली.
यावेळी त्यांनी वीस गुंठ्यात भाजीपाला करून त्यावर एका मुलगा इंजिनियर आणि दोन मुलींना शिक्षण देऊन आपला उदरनिर्वाह करणाऱ्या अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या संतोष तायप्पा खाडे या अल्पभूधारक शेतकऱ्याला मुलांच्या पुढील शिक्षणासाठी मदत करण्याचे आश्वासन आ.अवताडे यांनी दिली. तसेच जनाबाई तुकाराम चौगुले व विमाल विलास शिरसागर यांना मदत करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी आमदार आवताडे यांनी सर्व शेतकऱ्यांना सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. असा विश्वास देऊन पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना मदत मिळावी आणि नुकसान झालेल्या एक ही शेतकरी पंचनामा करण्यावाचून राहिला नाही पाहिजे याची काळजी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी अशा सूचना करून मारापूर येथील महावेध आणि महसूल च्या पर्जन्यमापक यंत्रामधील पावसाची आकडेवारी मध्ये तफावत असल्यामुळे ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर आमदार आवताडे यांनी सदर ठिकाणी भेट देत समंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत गावातील वाड्या वस्त्यावरील तसेच शेतातील धोकादायक इमारतीमध्ये वास्तव्य करू नये असे आवाहन केले.
दौऱ्यामध्ये तहसीलदार सचिन लंगोटे,BDO सुशील संसारे,कृषी अधिकारी मोरे अधिकारी नायब तहसीलदार शुभांगी जाधव , कृषी अधिकारी मनिषा मिसाळ पंचायत समितीचे विस्तार अधिकारी नरळे साहेब शाखा अभियंता योगेश खेर सर्व सर्कल, तलाठी,ग्रामसेवक, कृषी सहाय्यक लाइनमन उपस्थित होते.तसेच विजयसिंह दादा देशमुख, शिवाजी मोठे महाराज, प्रदीप खांडेकर,तानाजी काकडे,नितीन पाटील, विनायक यादव,अंकुश पडवळे, सुरेश भाकरे,संजय पवार, धनंजय पाटील,ऋतुराज बिले,डॉ.शहाजी साबळे, दत्ताआबा पाटील, किसन मासाळ, विठ्ठल महाराज लवटे, पांडुरंग आसबे, अनिल यादव बालाजी यादव, सारंग जाधव बालम मुलाणी, रवी घुले, आदी



